हे तीन पदार्थ पाणी किंवा दुधासोबत सात दिवस सेवन करा.. शरीरातील कॅल्शियमची मात्रा पूर्णपणे भरून निघेल, कधीच कॅल्शियम ची गोळी खावी लागणार नाही !

मित्रांनो आपल्या शरीराचे जडणघडणीसाठी कॅल्शियम हे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे. जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात जसे की सांधेदुखी, गुडघेदुखी हाडांचे आजार हाडे ठिसूळ होणे, चालताना हाडांमधून आवाज जाणवणे, दात दुखणे, दात हलणे, हिरड्यांमधून रक्त येणे तसेच मणक्याचे आजार, अशक्तपणा, थकवा, चेहऱ्यावर पांढरे चट्टे निर्माण होणे, उंची न वाढणे अशा अनेक सम’स्या आपल्याला उद्भवू शकतात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये काही प्रमाणात कॅल्शियम चा समावेश करायला हवा. कॅल्शियम हे अनेक पदार्थांमधून आपल्याला उपलब्ध होते जसे की चणे गूळ, कडधान्य यासारख्या पदार्थांमधून आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शियमची मात्रा उपलब्ध होत असते तसेच शरीराला योग्य पोषक तत्त्वांची भर मिळाली तर आपल्या शरीर देखील मजबूत बनते. शरीराला कोणत्याही प्रकारच्या समस्या सतावत नाही.

आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत त्या उपायामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम नव्याने निर्माण होणार आहे. भविष्यात इतके कॅल्शियम तयार होईल की तुम्हाला कधीच कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला हे काही पदार्थ वापरायचे आहेत. या पदार्थाच्या मदतीने तुमच्या शरीरातील सर्व गंभीर स’मस्या देखील दूर होऊन जाणार आहेत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढरे तीळ लागणार आहे. पांढरे तीळ इतके पावरफुल असतात की या पांढऱ्या तिळाचे सेवन जर आपण केले तर आपल्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा वाढू शकते. एक चमचा तीळामध्ये 100 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. हे पांढरे तीळ किराणाच्या दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध देखील होते. हल्ली हिवाळ्याचे दिवस आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात तीळ खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता देखील निर्माण होते, परिणामी आपल्या शरीराला उबदार बनवण्यासाठी तिळाचे सेवन लाभदायक ठरते.

तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे पोषक तत्व देखील उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या शरीरातील मांस पेशी सक्रिय तर असतात पण त्याचबरोबर हृदयाची कार्यशैली देखील सुधारते. हृदयापर्यंत रक्तभिसरण योग्य पद्धतीने होऊ लागते. आता आपल्याला एक वाटी तीळ घ्यायची आहे आणि हे तीळ भाजून घ्यायचे आहे यामुळे तीळ भाजल्याने पोषक तत्व देखील चांगले प्राप्त होतील. ही तीळ आपल्याला मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्यायची आहे यानंतर आपल्याला बदाम घ्यायचे आहे. हे बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उठल्यावर सेवन करायचे आहे परंतु हे बदाम सेवन करत असताना त्यावरील साल काढूनच सेवन करायचे आहे. हे बदाम सेवन करत असताना तुम्ही दुधाचा वापर देखील करू शकता किंवा मिक्सरमध्ये दूध आणि बदाम मिक्स करून दिवसभरातून एकदा सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा वाढणार आहे या नंतर कोमट पाणी सेवन करा. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीराला योग्य तो लाभ देखील प्राप्त होतो.

जर तुम्ही नियमितपणे दही सेवन केली तर तुमच्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळेल आणि म्हणूनच जेवण झाल्यावर दही अवश्य सेवन करा. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे यासाठी आपण जी तिळाची पावडर तयार केलेली होती ती तिळाची पावडर व गूळ सेवन करायचे आहे यानंतर गरम म्हणजेच कोमट पाणी प्यायचे आहे, असे जर आपण दिवसभरातून एकदा केले तर तुम्हाला शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता कधी भासणार नाही. हाता पायांना वेदना जाणवणार नाही. मणके दुखी सतावणार नाही तसेच तुम्ही तिळगुळ यांचे लाडू देखील खाल्ले तरी चालेल नुकतीच मकर संक्रांत झालेली आहे. या मकर संक्रांतीला अनेकांनी तिळाचे लाडू देखील सेवन केले असतील हे लाडू जरी तुम्ही दिवसभरातून एकदा सेवन केले तर तुम्हाला लाभ होऊ शकतो जास्त प्रमाणात तीळ सेवन करू नका अन्यथा तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन जुलाब देखील होऊ शकतात म्हणून योग्य समप्रमाणामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *