पाण्याप्रमाणे पातळ जुलाब जर होत असतील तर कोणत्याही प्रकारचे औषध न खाता घरच्या घरी करा हा एक उपाय, एका तासामध्ये बंद होतील जुलाब !

मित्रांनो मानवी शरीराला वेगवेगळ्या आजारांची लागण होत असते. एक आजार संपला की दुसरा आजार उद्भवतो. अनेकदा शरीरातील आजार दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे औषध उपचार देखील करत असतो परंतु अनेकांना काही गोळ्या औषधे सेवन केल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते शरीरात गरमी वाढते आणि याचे रूपांतर कालांतराने जुलाबामध्ये देखील होते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील की ज्यांना वारंवार जुलाब चा त्रास होत असतो. जुलाब हा असा आजार आहे जो एकदा लागला की तसे वर्णन करणे शक्य होत नाही. व्यक्तीला वारंवार बाथरूमला जावे लागते. जर आपण घरी असू तर ठीक परंतु बाहेर गेल्यावर जर जुलाब सुरू झाले तर व्यक्तीची पंचायत होते. जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर आजच्या लेखामध्ये सांगितलेल्या उपाय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

आजच्या लेखांमध्ये पाण्याप्रमाणे पातळ झालेल्या जुलाबांना थांबवण्यासाठी कोणत्याही औषधी उपचार बाहेरी न करता घरच्या घरी केला जाणारा एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने पुढील एका तासांमध्ये तुमचे जुलाब पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे. पोटाचे आरोग्य सुधारणार आहे चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दल…. आजचा उपाय करण्यासाठी आपल्या जिरे लागणार आहे. जिरे हा एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि प्रत्येकाच्या घरी सहजरीत्या उपलब्ध होतो. बाहेर काढतात तसेच तुमच्या पोटाचे आरोग्य देखील सुधारतात. जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी,पित्त, गॅस अपचन यासारख्या सम’स्या त्रास देत असतील तर अशावेळी देखील जीरा अत्यंत रामबाण औषध ठरते.

आता आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये गरजेनुसार जिरे टाकायचे आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित रित्या उकळू द्यायचे आहे जेणेकरून जिरे च्या अंगी जे काही सत्व असतात ते सारे सत्व पाण्यामध्ये उतरतील. आपल्याला हे मिश्रण आपण जशी चहा तयार करतो त्याच पद्धतीने तयार करायचे आहे. मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका कपामध्ये हे उकळलेले पाणी म्हणजेच अर्क काढून घ्यायचे आहे. आता त्यानंतर आपल्याला या अर्कामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर चवीसाठी थोडीशी साखर देखील टाकायचे आहे हे मिश्रण बनवत असताना व गॅसवर असताना साखर चा वापर अजिबात करायचा नाही, अशा प्रकारे आपण ही घरच्या घरी बनवलेली चहा किंवा अर्क सेवन केला तर पुढील एका तासांमध्ये तुमचे पातळ पाण्याप्रमाणे असलेले जुलाब थांबून जातील. पोटाचे आरोग्य सुधारेल. पचन संस्था जी बिघडलेली आहे ती व्यवस्थित रित्या कार्य करेल आणि तुमची धावपळ देखील होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *