बेसन पिठाच्या मदतीने चेहऱ्यावर व त्वचेवर पडलेले काळे डाग निशान झटक्यात होतील दूर, कोणतीही क्रीम लावायची गरज नाही!

मित्रांनो आपल्या चेहरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. चेहरा सुंदर असेल तर आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये भर पडत असते आणि प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपण सुंदर दिसायला हवं. गोरेपान दिसायला हवे अशी इच्छा मनामध्ये असणं स्वाभाविकच आहे कारण की आपल्या आजूबाजूला वातावरण देखील तसेच अनेकदा तयार केले गेलेले असते. जर तुम्ही दिसायला सुंदर असाल तर तुमच्याकडे लोक आकर्षित देखील होतात परंतु जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स असतील तर अनेकदा आपल्या चेहऱ्याची सौंदर्य खराब होऊन जाते. हे चेहऱ्यावरील सौंदर्य खराब होण्यामागे वेगवेगळे कारणे देखील असू शकतात. जर तुमच्या शरीरामध्ये काही हार्मोनल बदल घडत असतील तर अशावेळी देखील चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात किंवा जर तुम्ही वारंवार बाहेरचे मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ सेवन करत असाल यामुळे देखील शरीरावर व त्वचेवर बदल दिसून येतात. अनेकदा सुंदर दिसण्याच्या नादामध्ये आपल्यापैकी अनेक जण बाजारामध्ये उपलब्ध असणारे रासायनिक पदार्थ क्रीम लोशन यांचा भरमसाठ वापर करतात.

याचे साईड इफेक्ट आपल्या त्वचेवर होऊ लागतात त्यामुळे देखील चेहऱ्यावर काळे डाग येतात. आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत जो तुमच्या चेहऱ्याचे संरक्षण करणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर असलेले काळे डाग पूर्णपणे दूर करणार आहे.. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला बेसनाचे पीठ लागणार आहे. बेसनाचे पीठ म्हणजे चण्याचे पीठ. आपल्यापैकी अनेक जण घरामध्ये या पिठाचा उपयोग करून वेगवेगळ्या पदार्थ बनवत असतात. लहानपणी आपल्या घरातील जेष्ठ नागरिक चेहऱ्यावरील लव म्हणजेच पातळ केस दूर करण्यासाठी नवजात बालकांच्या चेहऱ्यावर व शरीरावर हे पीठ हमखास लावतात, यामुळे त्वचा चमकू लागते. त्वचेवर जे काही काळे डाग आहेत ते निघून जातात. बेसन पिठाचा वापर केल्याने शरीरावरचे अतिरिक्त तेल असते ते देखील कमी होऊन जाते. चेहऱ्यावरील काळे डाग वांग पिंपल्स नाहीसे होतात.

चेहऱ्यावरील मृतपेशी नष्ट होऊ लागते म्हणूनच बेसन पिठाचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कॉफी देखील लागणार आहे. कॉफीमध्ये कॅफेन नावाची तत्व असते हे तत्व तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते तसेच केसांची वाढ होण्यासाठी देखील केस कॉफी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, त्यानंतर आपल्याला दही लागणार आहे. दही मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील व त्वचेवरील विषारी घटक दूर करण्याची क्षमता दही मध्ये असते. आता आपल्याला हळद लागणार आहे. हळद तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये एंटीबॅक्टरियल, अँटिफंगल अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरावरील कोणत्याही प्रकारचे विषारी घटक दूर होऊन जातात. जर तुमच्या चेहऱ्यावर व शरीरावर मृतपेशी जमा झाल्या असतील त्या देखील नष्ट होऊन जातात.

तसेच शरीरावर एखादी जखम झालेली असेल काळे डाग चट्टे पडलेले असेल तर ते देखील निघून जातात. आता आपल्याला एका वाटीमध्ये बेसन पीठ घ्यायचे आहे. कॉफी घ्यायची आहे. दही घ्यायची आहे आणि हळद मिक्स करायची आहे. हे चार ही पदार्थ व्यवस्थित एकजीव केल्यानंतर छान पद्धतीने पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट आपल्याला चेहऱ्यावर लावायची आहे. चेहऱ्यावर लावल्यावर हलका मसाज करायचा आहे, जेणेकरून ही पेस्ट चेहऱ्यामध्ये व त्वचेवर परिणामकारक ठरू शकते. अर्धा तास तसेच शरीरावर व चेहऱ्यावर ठेवायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा व त्वचा स्वच्छ धुवायचा आहे, असे केल्याने तुम्हाला झालेला बदल दिसून येणार आहे. कमीत कमी आठवड्याभर हा उपाय जर तुम्ही केला तर शरीरावर झालेले बदल तुम्हाला पाहायला मिळतील. भविष्यात पुन्हा कधीच काळे डाग, वांग, पिंपल्स कोणत्याही प्रकारचे स्किन इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *